बजाज फिनसर्व्हने नुकताच १:५ स्प्लिट आणि १:१ बोनस जाहीर केला. भरपूर लोकांनी आधी खूप जास्त किंमतीचा (१७,००० ₹) शेअर १,७०० रुपयांना खरेदी केला.
माझ्याकडे आधीच काही शेअर्स असल्याने पण मी एकही शेअर खरेदी केला नाही.
एप्रिल २०२० लॉकडावून मध्ये भारतीय शेअर बाजार ४०%पेक्षा जास्त कोसळला होता. त्यावेळी मी बजाज फिनसर्व्हचे ४,२६१.७५ रुपयांमध्ये १५ शेअर्स खरेदी केले होते. ( १५ x ४,२६१.७५ = ६३,९२६.२५ ₹)
डिसेंबर २०२० मध्ये शेअरची किंमत ८,८०० झाली त्यावेळी मी ५ शेयर्स विकून टाकले. ( ५ x ८,८८०० = ४४,००० ₹)
आणि शिल्लक शेअर्स लॉन्गटर्मसाठी होल्ड केले.
सध्या १:५ स्प्लिट आणि १:१ बोनसच्या रेकॉर्ड डेटनंतर माझ्याकडे १० चे १०० स्टॉक झाले आणि शेअर्सची किंमत ४२६.१८ रुपये झाली.
( उर्वरित ५० बोनस शेअर्स अकाउंटमध्ये १०-१५ दिवसात जमा होतील.)
म्हणजेच माझ्याकडे ४२६.१८ रुपयांचे १०० शेअर्स असतील. ( १०० x ४२६.१८ = ४२,६१८ ₹)
सुरुवातील केलेली गुंतवणूक : ६३,९२६.२५ ₹
विकलेल्या शेअर्स ची किंमत : -४४,००० ₹
उर्वरित गुंतवणूक रक्कम : १९,९२६.२५ ₹
म्हणजेच तात्त्विकदृष्टया हे १०० शेअर्स मला २० हजारला पडले. आणि तेच शेअर्स सध्द्याच्या बाजारभावाने घ्यायचे असतील तर मला १,७५,००० ₹ मोजावे लागतील. (१०० x १,७३६₹)
दैनंदिन जीवनातील काही गोष्टींसाठी शेअर मार्केटमध्ये अधूनमधून थोडे प्रॉफिट बुक करावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
तुमचे मत कंमेंटमध्ये नक्की कळवा.