know-the-ongoing-game-of-₹-2000-notes-udyojak.info
know-the-ongoing-game-of-₹-2000-notes-udyojak.info

जाणून घ्या २०००च्या नोटांचा सुरु असलेला खेळ

निर्णय :

भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹ २०००च्या  नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांनी २ हजार रुपयांच्या नवीन नोटा जारी करू नये, असेही निर्देशही दिले आहेत. ह्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला बँक किंवा एटीएममधून २००० रुपयांच्या नव्या नोटा काढता येणार नाहीत.

मुदत :

₹ २००० रुपयांच्या नोट धारकांना २३ मे पासून ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा जमा करून इतर मूल्याच्या नोटा बदलून घेण्यास सांगितले आहे. तथापि , RBI ने स्पष्ट केले आहे की ३० सप्टेंबरनंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीररित्या चलनात राहतील.

गरज :

भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृत परिपत्रकात असेही म्हटले आहे की, RBI कायदा, १९३४ च्या कलम २४(१) अंतर्गत नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी सर्व ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा काढून घेतल्यानंतर बाजारात चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ₹ २००० मूल्याची नोट जारी करण्यात आली होती.

उद्दिष्टपूर्ती :

इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर ₹ २००० मूल्याची बँक नोट बाजारात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या नोटांची छपाई आधीच थांबवण्यात आली होती. तसेच बँकेत एकदा गेलेली नोट परत चलनात येत नव्हती. बहुतांश सामान्य लोकांकडे ही नोट आता नाही.

सध्याचे आकडे :

₹ २००० मूल्याच्या सुमारे ८९% नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या. त्यापैकी आत्ता केवळ १०.८% नोटा चलनात आहे. चलनात असलेल्या या नोटांचे एकूण मूल्य ३१ मार्च २०१८ रोजी ₹ ६.७३ लाख कोटी होते. तर तेच ३१ मार्च २०२३ रोजी ₹ ३.६२ लाख कोटींवर होते.

करायचं कुठे ?

₹ २०००च्या नोटांची बदली भारतातील कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये केली जाऊ शकते. तसेच हि सुविधा आर.बी.आय.च्या इश्यू डिपार्टमेंट असलेल्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्येही उपलब्ध असेल.

करायचं कसं ?

सर्वसामान्य नागरिक त्यांचं ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेत नोटा जमा करु शकतात. खाते नसलेला व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत एका दिवशी ₹ २०,०००च्या मर्यादेपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतो.

अपेक्षित :

RBI ला अपेक्षा आहे की, लोकांना बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी पुरेसा असून, चलनात असलेल्या बहुतेक ₹२०००च्या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत दिलेल्या मुदतीत बँकांकडे परत येतील.

तसही २०१९ नंतर बाजारातून २००० रुपयांच्या नोटा हळूहळू कमी होऊ लागल्या होत्या हे तुमच्याही लक्षात आले होते का ?
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *