एकूण संपत्ती : ६२० मिलियन डॉलर्स, जवळजवळ, मेस्सी दिवसाला सुमारे २.९४ कोटी रुपये कमावतो.
फोर्ब्स 2022 नुसार :
- मैदानावरील कमाई : ७५ मिलियन डॉलर्स
- २०२१-२०२२ दरम्यान मैदानाबाहेरची कमाई : ५५ मिलियन डॉलर्स
- मेस्सीच्या मालकीच्या कंपन्या : मेस्सी स्टोअर, MiM हॉटेल्स चेन्स इ.
ADIDAS: २०६.९३ कोटी रुपये
Adidas या जर्मन स्पोर्ट्सवेअर ब्रँडने २००६ मध्ये मेस्सी बरोबर करार केला होता. आणि नंतर २०१७ मध्ये वार्षिक २५ मिलियन डॉलर्सप्रमाणे कायमस्वरूपी करार केला होता.
इंस्टाग्राम: १४.५६ कोटी रुपये
फोर्ब्स 2022 च्या अहवालानुसार, Instagram प्रति पोस्ट १.७७ मिलियन डॉलर्स देते.
SOCIOS: १२६.०५ कोटी रुपये
Socios.com या फॅन टोकन साइटने मार्च २०२२ मध्ये २० मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा ३ वर्षांसाठी करार केला होता.
पेप्सी: ६६.२१ कोटी
Gatorade आणि Pepsi च्या जाहिरातीं द्वारे मेस्सी दरवर्षी ८ मिलियन डॉलर्स कमावतो.
Lay’s
२०१४ मध्ये भारतात ५ करोड Lays बॅगवर मेस्सीचा फोटो छापला गेला होता. यामध्ये टीव्ही जाहिरातींचाही समावेश होता आणि ही मोहीम ६०हून अधिक देशांमध्ये राबवण्यात आली.
मास्टरकार्ड
मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी उभारण्यासाठी मेस्सी मास्टरकार्डचा ब्रँड अँबेसेडर आहे.
तसेच मेस्सी Ooredoo, Jacob & Co, Budweiser, Siksilk, Leafty, Byju’s, Gillette इत्यादी ब्रँडशी देखील संलग्न आहे.