मार्चमध्ये, अशी अनेक कामे आहेत जी लोकांना दरवर्षी काही पैसे वाचवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी करावी लागतात. यामध्ये गुंतवणूक, इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
- आधार-पॅन लिंक करा.
- म्युच्युअल फंडस् आणि डिमॅट अकाउंट्सला नॉमिनी रजिस्टर करून घ्या.
- कर सवलतीसाठी कंपनीला फॉर्म 12BB भरून द्या.
- कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवण्यासाठी गुंतवणूक करा.
- जुन्या कर नियमानुसार २०२०-२१ साठी सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे आवश्यक.
- पंतप्रधान वय वंदना योजनेचा लाभ
पॅन-आधार लिंक करा:
सरकारने गेल्या काही वर्षांपासून पॅन आधारशी जोडणे अनिवार्य केले आहे. तथापि, असे अनेक आहेत ज्यांनी अद्याप प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे, जर तुम्ही ते लिंक केले नसेल, तर तुम्ही ते ३१ मार्चपूर्वी करा. तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. तुम्ही तुमचा पॅन तुमच्या आधारशी लिंक न केल्यास १ एप्रिलपासून तुमचा पॅन निष्क्रिय होईल.
म्युच्युअल फंडस् आणि डिमॅट अकाउंट्सला नॉमिनी रजिस्टर करा:
जर तुम्ही म्युच्युअल फंडात किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ३१ मार्चपर्यंत तुमचे नॉमिनी रजिस्टर करणे सादर करणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक फ्रीझ केली जाईल. आणि त्यामध्ये पुढील व्यवहार करता येणार नाहीत.
कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवण्यासाठी गुंतवणूक करा:
जर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही ३१ मार्चपूर्वी गुंतवणूक करू शकता. कर सवलत मिळवण्यासाठी PPF, सुकन्या समृद्धी योजना, ELSS फंडस् इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता.
पंतप्रधान वय वंदना योजनेचा लाभ:
प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) ही एक विमा पॉलिसी-सह-पेन्शन योजना आहे. या योजनेत एखादी व्यक्ती १५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना सध्या ७.४०% वार्षिक व्याजासह नियमित उत्पन्न प्रदान करते. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ आहे.