उद्योजक.इन्फो

माहिती आर्थिक विश्वातील

मुलीच्या लग्नासाठी वाचवलेल्या पैशातून सुरु केला व्यवसाय – “गौकृती”

business-started-with-money-saved-for-daughters-marriage-gaukriti - udyojak-info

जयपूरच्या या माणसाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी वाचवलेले पैसे, शेणाचे कागदात रूपांतर करण्याच्या व्यवसायासाठी वापरले. आज करोडोंमध्ये कमावत आहेत.

एखाद्या स्टार्टअप कल्पनेसाठी तुम्ही किती वेळा एखाद्याला ‘वेडा’ म्हणून संबोधले असल्याचे पाहिले आहे ? कदाचित बराच वेळ.

आपल्या सामाजिक वर्तुळातील मते नेहमीच आपल्या निर्णयांना आकार देतात. आणि आपण त्यांना जवळजवळ बळीच पडतो.

भीम राज शर्मा, अशी व्यक्ती आहे ज्यांनी सर्व प्रतिकूलता आणि सर्व टीकांविरुद्ध जाऊन एक स्टार्टअप सुरु केला. ज्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही, आज ते करोडो कमावतात.

भीम राज शर्मा हे मूळचे जयपूरचे. २०१७ मध्ये त्यांनी “गौकृति“ची स्थापना केली. हा एक असा स्टार्टअप आहे जो कागद बनवण्यासाठी शेणाचा वापर करतो. त्यानंतर हा पेपर नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो.

२०१४ मध्ये भीम राज यांनी कागद तयार करण्यासाठी हत्तीच्या शेणाचा वापर करून व्यवसाय केला होता. तेव्हा त्यांना वाटले की गायीच्या शेणाचा वापर करूनही असे करता येईल.

जेव्हा त्यांनी ही कल्पना त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनी काहीही विचार न करता ती नाकारली. असा काहीतरी विचार केल्यामुळे आणि भविष्यात त्याची क्षमता असेल यावर विश्वास ठेवल्यामुळे, त्याच्या वर्तुळातील काहींनी त्यांना ‘वेडा’ देखील म्हटले.

भीम राज यांनी या सगळ्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी त्याच्या मित्रांकडून कर्ज मागितले, परंतु कोणीही कल्पना सुद्धा मनावर न घेतल्याने, आर्थिक मदत करणे तर दूरच. शेवटी भीम राज यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी वाचवलेले पैसे स्टार्टअपसाठी वापरण्याचा आणि एक युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या युनिटमध्ये भीम राज यांनी शेणाचे कागदात रूपांतर करण्यास सुरुवात केली. त्यांनी याचे पेटंट घेण्याचे ठरवले आणि प्रक्रिया पुढे नेली. २०१७ मध्ये त्यांनी ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांची ‘गौकृती’ नावाची कंपनी स्थापन केली.

सुरुवातीला, तयार केलेल्या कागदाची गुणवत्ता अजिबात दर्जेदार नव्हती. ते चुरगळले होते आणि कोणत्याही प्रकारे वापरले जाऊ शकत नव्हते. या सुरुवातीच्या अपयशामुळे लोकांना भीम यांची थट्टा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पण ते कधीच थांबले नाहीत.

भीम राज यांनी पुढील काही महिने संशोधन आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समर्पित केले. शेवटी, कठोर परिश्रमांना फळ मिळाले आणि भीम राज शर्मा यांनी एक विशेष प्रक्रिया शोधून काढली जी शेणाचे उत्कृष्ट दर्जाच्या कागदात रूपांतरित करते.

आज तीन गोष्टींचा वापर करून “गौकृती”चा  पेपर बनवला जातो :

  • गाईचे शेण
  • मूत्र
  • टाकाऊ कापूस

“गौकृती”द्वारे, भीम राज शर्मा नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये पसरलेल्या मोठ्या ग्राहकांना ३,००० हून अधिक कागद विकतात.

कोरोना काळात “गौकृती”ने शेणापासून बनलेल्या कागदापासून मास्क बनवले होते. आणि लोकांनी फेकून दिलेले मास्क हे विघटनशील असल्यामुळे जमिनीत खतांप्रमाणे मिसळून गेले.

समाजाच्या तीव्र टीका आणि टिंगल दरम्यान सुरू झालेला व्यवसायातून आज भीम राज शर्मा करोडो रुपये कमावतात .

गौकृती हा भारतातील कागद उद्योगात क्रांती घडवणारा उपक्रम आहे. शेतकऱ्यांकडून १० रुपये प्रति किलो या दराने शेणखत खरेदी करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हे “गौकृती”चे ध्येय आहे. याव्यतिरिक्त, युनिटमध्ये पेपर तयार करण्यासाठी ग्रामीण महिलांना रोजगार देणे हे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

हवामानबदल आणि जंगलतोड यांबद्दलच्या वाढत्या चिंतेमध्ये, टिकाऊपणा आणि पर्यावरण संरक्षण हे असे विषय आहेत ज्यांना व्यवसाय आणि उपक्रमांनी उचलून धरणे आवश्यक आहे.

भीम राज शर्मा यांची गौकृती ही फक्त समस्या सोडवत नाही, तर ती एक उपाय देते आणि दररोज त्याची अंमलबजावणी करते. तुम्ही गौकृती“च्या वेबसाईटला भेट देऊन पेपर खरेदी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *