मद्रास रबर फॅक्टरी (MRF)चा शेअर हा आज भारतातील ट्रेडिंग एक्सचेंजवरील सर्वात महागडा शेअर आहे. त्याच्या एका शेअरची किंमत ६८,०००₹ आहे.
पण तुम्हाला MRF बद्दल ही माहीती आहे का ??
- मद्रास रबर फॅक्टरी (MRF) १९४६ मध्ये रबरी फुगे बनवणारी कंपनी म्हणून फक्त १४,००० रुपयांच्या गुंतवणुकीमधुन सुरू करण्यात आली.
- आज, ही भारतातील सर्वात मोठी टायर तसेच कन्व्हेअर बेल्ट्स, रबरी खेळणी, रंग ऊत्पादन करणारी कंपनी आहे.
- तिचे मूल्य आज ३७,००० कोटी रुपये आहे.
- नोव्हेंबर १९६० मध्ये MRF लिमिटेड ही कंपनी खाजगी करण्यात आली. १ एप्रिल १९६१ रोजी कंपनी सार्वजनिक झाली.
- १९६४ मध्ये निर्यात बाजार विकसित करण्यासाठी बेरूत, लेबनान येथे मुख्यकार्यालयाची स्थापना करण्यात आली. आणि तिथेच सध्याच्या “muscleman” ह्या लोगोचा जन्म झाला.
- MRF ने १९९७ मध्ये मारुतीच्या सहकार्याने आपली पहिली फॉर्म्युला- 3 कार बनवली. आणि १९९८ मध्ये मारुतीच्या सहकार्याने फॉर्म्युला मारुती रेसिंगची स्थापना केली.