वेदांता कंपनीचा स्टॉक १४ सप्टेंबर २०२२ रोजी १०%ने वाढला. यामागील महत्वाचे कारण कंपनी करणार असलेल्या नवीन ३ गुंतवणूकीबाबतच्या घोषणा असे सांगण्यात येत आहे.
१. पहिली घोषणा :
तैवानस्तिथ फॉक्सकॉन आणि वेदांता एकत्रितपणे गुजरातमध्ये नवीन सेमीकंडक्टर चिप प्लॅन्ट सुरु करेल. एकूण गुंतवणुकीचे मूल्य १.५४५ लाख करोड असेल. यामुळे १ लाख नवीन रोजगार निर्माण होतील. इलेक्ट्रॉनिक्स वापरकर्त्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. भारतात बनवलेल्या सेमीकंडक्टर्समुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या किमतीत कमालीची घट होईल.
२. दुसरी घोषणा :
वेदांता महाराष्ट्रात टीव्ही उपकरण आणि आयफोन मॅन्युफॅक्चरिंग हबची स्थापन करेल. हा प्लॅन्ट फॉक्सकॉन बरोबर सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण फॉक्सकॉन हा भारतातील सर्वात मोठा आयफोन असेंबलर आहे.
३. तिसरी घोषणा :
वेदांताने ओडिशामध्ये २५ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची आपली योजना जाहीर केली. ह्या गुंतवणुकीचा मुख्य उद्द्येश्य त्यांच्या ॲल्युमिनियम,फेरोक्रोम आणि खाणकाम व्यवसायाचा विस्तार करणे असेल.
पण, सेमीकंडक्टर बिझनेसचा फायदा वेदांताला नाही तर त्याची Parent कंपनी Volcon Investmentला होणार आहे. १४ सप्टेंबरला कंपनीच्या शेअरमध्ये १३%ची वाढ झाल्यानंतर हे स्पष्टीकरण कंपनीने SEBIला दिले आहे.