चीन आणि तैवान ह्या दोन्ही देशांमध्ये नुकतेच तणावपूर्ण वातावरण सर्व जगाने पहिले.
तैवान हा सेमीकंडक्टर चिप्सचा जगातील सर्वात मोठा करार उत्पादक (Contract manufacturer) आहे.
जगातील दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणे तैवानमध्ये बनवलेल्या चिपवरती अवलंबून आहेत.
यामध्ये स्मार्टफोन,संगणक,वाहने आणि शस्त्रात्र प्रणाली यांचा समावेश आहे.
तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (TSMC)कडे जगातील ५० % पेक्षा जास्त बाजारपेठ आहे.
Apple आणि इतर अमेरिकन कंपन्यांसाठी हे मुख्य पुरवठादार (Supplier) आहे.
चीन देखील तैवानच्या सेमीकंडक्टर चिप्सवर अवलंबून आहे.
२०२० मध्ये जगातील सेमीकंडक्टर कॉन्ट्रॅक्ट उत्पादकांद्वारे कमाई केलेल्या ६० % पेक्षा जास्त कमाईसाठी TSMC जबाबदार आहे.
काही तज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका तैवानच्या ह्या चिप कंपनीवर अवलंबून असल्याने चीनच्या हल्ल्यापासून तैवानचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेत आहे.
तुम्हालाही सेमी-कंडक्टर सेक्टरमध्ये गुंतवणूक करायची आहे का ?