आजकाल Truecaller हे कॉलर ID आणि स्पॅम शोधण्यासाठी अविभाज्य अॅप आहे. आणि प्रत्येक स्मार्टफोनवर डाउनलोड केले जाणारे पहिले अॅप आहे.
अॅपची सुरुवात झाली जेव्हा संस्थापक विद्यार्थी होते, ज्यांना एक सेवा तयार करायची होती जी अज्ञात नंबरवरून येणारे कॉल सहज ओळखू शकेल.
प्रत्येक युझरला हे अॅप एड्रेस बुक /संपर्कांमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देण्यास विचारतो.
त्यानंतर अॅप हा डेटा कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड करतो. अनेक डेटा अल्गोरिदमची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, हा डेटा सर्व ट्रूकॉलर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतो.
२००९ ते २०११ पर्यंत Truecaller चे संस्थापक नामी आणि ऍलन यांना विश्वास होता की त्यांच्या ह्या कल्पनेत भरपूर क्षमता आहे.
जर एखादी कल्पना वास्तविक जीवनात उपयोगी असेल तर सर्वजण आपोआप उचलून घेतात.
अश्याप्रकारे Truecaller ने आपल्या फोनवरून सहज दिलेल्या क्रमांकांपासून जगातील सर्वात मोठे फोनबुक तयार केले.
तुमच्याही फोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल आहे का ?