उद्योजक.इन्फो

माहिती आर्थिक विश्वातील

कशी झाली “mamaearth”ची सुरुवात ?

how-did-mamaearth-get-started-udyojak.info

अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना गझल ह्यांना समाजलें की तिथे बेबीकेअर उत्पादनांबाबत लोकांमध्ये खूप जागरूकता आहे.

ज्यावेळी वरुण आणि गझल ह्यांना त्यांचे पहिले बाळ हवे होते, तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की बाजारात उपलब्ध बेबीकेअर उत्पादनांमध्ये हानिकारक घटक आहेत. आणि इतर सुरक्षित पर्यायही उपलब्ध नाहीत.

त्यांना भारतीय बाजारात सुरक्षित बेबीकेअर उत्पादने न मिळाल्याने, त्यांनी ते अमेरिकेहून आयात करणे सुरु केले. पण ते अधिक महाग आणि गैरसोयीचे होत होते.

त्यांना जाणवले की फक्त तेच नाहीत, तर भारतात अश्या बऱ्याच पालकांना ह्या गोष्टीसाठी खटाटोप करावी लागत आहे.

ह्यावर काहीतरी मार्ग काढण्याच्या उद्दिष्टाने ह्या जोडीने २०१६ मध्ये “Honasa Consumer Private Limited” ही कंपनी स्थापन केली. आणि त्याचवर्षी डिसेंबरमध्ये “mamaearth“ह्या ब्रँडची टॉक्सिन-फ्री बेबीकेअर उत्पादने लाँच केली.

त्यासाठी एक R&D टीम तयार केली आणि सर्व योग्य प्रमाणपत्रांसाठी नोंदणी केली.

या सर्वामुळे “mamaearth”ला गती मिळाली आणि कमी कालावधीत MADE SAFE®️ प्रमाणित उत्पादने बनवणारा आशियातील पहिला ब्रँड बनला.

पालकांवरील बालसंगोपनाचा तणाव कमी करणे आमचे ध्येय आहे. बाळ आणि त्यांचे पालक या दोघांसाठी जग अधिक सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही सतत नवनवीन संशोधन आणि सुधारणा करत आहोत.
– गझल अलघ

“mamaearth” हा पहिला भारतीय सौंदर्य उत्पादक ब्रँड आहे जो त्यांच्या उत्पादनांमध्ये विषारी रसायन किंवा घटक मिसळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *