“अमुल इंडिया” ही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी आहे. पण ही कंपनी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड का नाही ?
अमूल ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, तर गुजरातच्या डेअरी सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था आहे.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ‘शेअरहोल्डर्स’ असतात. पण एका सहकारी संस्थेमध्ये ‘सभासद’ असतात.
“अमूल”चे प्राथमिक उद्दिष्ट नफा कमावणे हे नाही. परंतु त्यांचा मुख्य उद्देश सभासद आणि दूध उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे आहे. तसेच आपल्या ग्राहकांचे हित पाहणे हे आहे.
कंपनी आपल्या दुधाच्या किंमतीचा ८०-८२% हिस्सा शेतकरी आणि दूध उत्पादकांना देते. उर्वरित रक्कम वाहतूक आणि इतर खर्चासाठी जाते.
“अमूल”चे भारतभर १६.६ दशलक्ष दूध उत्पादक सभासद आहेत. एक सहकारी संस्था शेअर मार्केटवरती लिस्ट होणे खूप कठीण आहे.
जरी अमूल शेअर मार्केटवरती लिस्ट झालीच, तरी गुंतवणूकदार अश्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार नाहीत जिचे प्राथमिक उद्दिष्ट नफा कमावणे हे नाही.
तुम्हाला “अमूल”चा लॉंग फॉर्म माहिती आहे का ?