ऍक्सिस बँकेने नुकतेच सिटी बँकेचा रिटेल बिजनेस १२,३२५ करोड रुपयांना विकत घेतला.
कोटक बँक आणि इंडसइंड बँक सुद्धा ह्या रेसमध्ये होते. पण ऍक्सिस बँकेने हि डील जिंकली.
का सर्व बँकांचा सिटी बँकेवर डोळा होता ? पाहूयात त्यामागची ३ मोठी कारणे.
१. सिटी बँकेकडे २५ लाख क्रेडिट कार्ड युझर्स आहेत. सिटी बँकेचे ग्राहक महिन्याला सरासरी १४,००० रुपयांचे व्यवहार करतात. तेच इतर बॅंकेचे ग्राहक १२,००० रुपयांचे व्यवहार करतात.
२. सिटी बँकेकडे १.१ लाख करोडची AMC (Asset Under Management) आहे. जी इतर मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या बरोबर आहे.
३. सिटी बँकेचे बहुतेक ग्राहक हे जास्त पैसेवाले आणि कॉर्पोरेट आहेत. ज्यामुळे ह्या बँकेचे NPA खूप कमी आहेत.
ह्या खरेदीनंतर ऍक्सिस बँक हि भारतातील ३ नंबरची क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक बनली आहे.
तुम्हाला वाटते का ऍक्सिस बँक हि भारतातील १ नंबर खाजगी बँक होईल ?