एचडीएफसी लिमिटेडच्या २५ शेअर्ससाठी रेकॉर्ड तारखेनुसार एचडीएफसी बँकेचे ४२ शेअर्स मिळतील.
एचडीएफसी लिमिटेडमध्ये एचडीएफसी बँकेची भागीरदारी ४१% होईल.
RBI, IRDAI, CCI, SEBI, शेअरहोल्डर्स , कर्जदार आणि स्टॉक एक्स्चेंज यांच्या मंजुरीनंतरच विलीनीकरण १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या सर्व उपकंपन्या एचडीएफसी बँकेच्या मालकीच्या होतील.
विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेला त्यांच्या गृहकर्ज पोर्टफोलिओमध्ये वाढ होण्यास मदत होईल.
तसेच एचडीएफसी लिमिटेडची मोठी ग्राहकसंख्या आणि मजबूत वितरण नेटवर्क त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मदत करेल.
HDFC बँकेने चौथ्या तिमाहीचे ठोस निकाल जाहीर केले.
- त्यांचे लोनबुक २१% YOY वाढलेले आहेत.
- ठेवींमध्ये १७% वार्षिक वाढ झाली आहे.
- CASA Ratio ४८% पर्यंत सुधारला आहे.
तुम्हाला माहिती का ?
एचडीएफसी लिमिटेडचे ७०% ग्राहक एचडीएफसी बँकेसोबत व्यवहार करत नाहीत.