डिसेंबर २०२१ मध्ये आयकर आणि GST इंटेलिजन्स महासंचालनालयाने पीयूष जैन यांच्या कानपूर येथील घरावर छापा टाकला.
त्यांनी वसूल केलेली रक्कम 3.3% दराने SBI बँकेमध्ये मुदत ठेव म्हणून जमा केली आहे. बँक दिवसाला रु. १७८,१०४ म्हणजेच दर तासाला ७४२१ रुपये व्याज देत आहे.
नंतर GST इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने चुकीच्या ओळखीच्या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील व्यापारी पीयूष जैन यांच्याकडून जवळपास रु. १९६ कोटी रोख आणि २३ किलो सोने जप्त केल्याचा आरोप नाकारला.
DGGI ने स्पष्ट केले की समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केल्यावर त्यांनी विशिष्ट माहितीच्या आधारे योग्य व्यक्तीवर छापा टाकला होता.
परंतु त्यांचे लक्ष्य समाजवादी पक्षनेते आणि व्यापारी पुष्पराज जैन होते. परंतु चुकून पियुष जैन यांच्यावर छापा टाकला.