boAt ची स्थापना एक टिकाऊ USB केबल्सचा निर्माता म्हणून २०१५ मध्ये झाली. २०१६ मध्ये Apple Airpods च्या प्रचंड लोकप्रियतेनंतर, boAt ने हि एक संधी ओळखली. आणि ऑडिओ मार्केटमध्ये प्रवेश केला.
आज boAt हा भारतातील सर्वात मोठा ऑडिओ–वेअर ब्रँड आहे. ज्याचा बाजार हिस्सा ३५% आहे आणि जागतिक स्तरावर ५ वा सर्वात मोठा ऑडिओ–वेअर ब्रँड आहे.
“boAt” ने हे यश मिळवले अवघ्या ५ वर्षात. पण कसे ?
२०१६ मध्ये वायरलेस ऑडिओवेअर खूप महाग होते. त्यात Jio क्रांतीमुळे, अशा इलेक्ट्रॉनिक्सची मागणी वाढत होती, पण बहुतेक लोकांना ते परवडत नव्हते.
अशा प्रकारे boAt ने भारतीयांना सर्वात जास्त काय आवडते यावर लक्ष केंद्रित करून परवडणारी, उत्कृष्ट दर्जाची आणि स्टायलिश वेअरेबल लॉन्च केली.
पण इतर उपलब्ध ब्रँड्सपासून boAt वेगळा कसा ठरला ?
केवळ इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड बनण्याऐवजी, boAt ने लाईफस्टाईल ब्रँड बनण्याचा प्रयत्न केला. आणि हीच त्यांची खरी रणनीती होती.
boAt भारतीयांना आवडत असलेल्या २ गोष्टींवर लक्ष केंद्रित केले : चित्रपट आणि क्रिकेट. boAt ने दोन्ही क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तींना ब्रँड अँम्बॅसॅडर्स म्हणून नियुक्त केले आणि त्यांचे जोरदार मार्केटिंग केले.
२०२१ मध्ये, boAt ने दररोज वेअरेबलचे १५,००० युनिट्स विकले. त्यातूनच त्यांनी १५११ कोटीचा रुपयांचा बिझनेस केला. २०२०च्या तुलनेत तो ११५%ने वाढला. यामध्ये कंपनीला ७८ कोटी रुपयांचा नफा झाला.
तुम्हाला वाटते का boAt भविष्यातही आपले स्थान टिकवून राहील ?