पेटीएमचा शेअर गुरुवारी 12% घसरून रु. 597 पर्यंत गेला, म्हणजे रु. 2,150 च्या इश्यू किंमतीपासून सुमारे 72% खाली गेला.
पण पेटीएमच्या शेअरची किंमत का घसरत आहे?
11 मार्च 2022 रोजी RBI ने Paytm वर नवीन ग्राहक जोडण्यासाठी ताबडतोब निर्बंध घातले.
आर.बी.आय. ने पेटीएमच्या KYC, डेटा प्रायव्हसी, डेटा स्टोरेज आणि डेटा आउटसोर्सिंग पद्धतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
RBI ला असे आढळले की कंपनीच्या सर्व्हरने पेटीएम पेमेंट्स बँकेत अप्रत्यक्षपणे हिस्सा असलेल्या चिनी संस्थांशी माहिती शेअर केली आहे.
“पेटीएम पेमेंट्स बँक” हि पेटीएम आणि तिचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांची जॉईंट व्हेंचर आहे. पण चीनच्या अलीबाबा ग्रुप होल्डिंग आणि जॅक मा यांच्या अँट ग्रुपकडे पेटीएमचे काही शेअर्स आहेत.
पेटीएम पेमेंट्स बँकेने हजारो ग्राहकांकडून योग्य KYC कागदपत्रांशिवाय खाती सुरू करून घेतली आहेत. यापैकी काही मनी लॉन्ड्रिंगच्या उद्देशाने असू शकतात अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेला आता संपूर्ण आयटी सिस्टम ऑडिट करणे बंधनकारक आहे.
पेटीएम शेअर रिकव्हर होईल यावर तुमचा विश्वास आहे का?