इंडिगो पेंट्स लिमिटेडची स्थापना 2000 मध्ये लो-एंड सिमेंट पेंट्स निर्माता म्हणून झाली. सुरवातीपासूनच, कंपनीने संपूर्ण भारतात पोहोचण्यासाठी मोठे डिस्ट्रिब्युटर नेटवर्क स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
इंडिगो पेंट्स ही भारतातील वेगाने विकसित होणारी पेंट कंपन्यांपैकी एक आहे. आणि कमाईच्या बाबतीत, पेंट उद्योगातील ही 5 वी सर्वात मोठी कंपनी आहे.
कंपनी जोधपूर (राजस्थान), कोची (केरळ) आणि पुडुकोट्टाई (तामिळनाडू) या तीन ठिकाणी प्रोडक्टशन सुविधा चालविते. हि ठिकाणे या सुविधांची मालवाहतूक किंमत कमी करणार्या आणि कंपनीला कमी किमतीची उत्पादने करण्यास लागणाऱ्या कच्च्या मालाच्या स्त्रोतांच्या संबंधित धोरणात्मकरित्या निवडली गेली आहे.
वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुडुकोट्टाई (तामिळनाडू) येथे वॉटरबेस्ड पेंट तयार करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्याची कंपनीची योजना आहे.
प्लस पॉईंट्स :
- भिन्न उत्पादनांसह मोठा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ
- चांगले-सिद्ध आणि सातत्याने ट्रॅक रेकॉर्डमध्ये वाढ
- मजबूत ब्रँड इक्विटी
- विस्तृत नेटवर्क वितरण
- धोरणात्मकदृष्ट्या उत्पादन सुविधा
कंपनी प्रमोटर :
हेमंत जालान, अनिता जालान, पराग जालान, कमला प्रसाद जालान, तारा देवी जालान आणि हॅलोजन केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड हे या कंपनीचे प्रमोटर आहेत.
गेल्या पाच वर्षातील कंपनीची आर्थिक कामगिरी:
IPOचे उद्देश:
- पुडुकोट्टाई येथे उत्पादन सुविधांच्या विस्तारासाठी भांडवली खर्चाची आवश्यकता पूर्ण करणे
- टिंटिंग मशीन आणि गायरोशेकर खरेदी करणे
- सर्व किंवा काही विशिष्ट कर्ज परतफेड करणे
- सामान्य कॉर्पोरेट हेतू पूर्ण करणे
पीअर:
IPOचा तपशील:
इश्यूचा टाईप | बुक बिल्ट इश्यू IPO |
दर्शनी मूल्य | ₹ 10 प्रति इक्विटी शेअर |
IPO किंमत | ₹1488 – ₹1490 प्रति इक्विटी शेअर |
मार्केट लॉट | 10 शेअर्स |
किमान ऑर्डर | 10 शेअर्स |
सूचीबद्ध एक्स्चेंज | BSE आणि NSE |
IPO साईझ | ₹10 चे xxxx शेअर्स (₹ 1,176 कोटी) |
फ्रेश इश्यू | ₹10 चे xxxx शेअर्स (₹ 300 कोटी) |
ऑफर फॉर सेल | ₹10 चे 5,840,000 शेअर्स |
IPO उघडण्याची तारीख | 20 जानेवारी 2021 |
IPO बंद होण्याची तारीख | 22 जानेवारी 2021 |
बेसिस ऑफ अलॉटमेंटची तारीख | 28 जानेवारी 2021 |
रिफंडची तारीख | 29 जानेवारी 2021 |
डीमॅट खात्यावर क्रेडिट | 01 फेब्रुवारी 2021 |
लिस्टींगची तारीख | 02 फेब्रुवारी 2021 |
IPO लॉट साइज:
अर्ज | लॉट | शेअर्स | रक्कम (कट ऑफ) |
---|---|---|---|
किमान | 01 | 10 | ₹14,900 |
जास्तीत जास्त | 13 | 130 | ₹1,93,700 |
IPO सब्स्क्रिपशन
कॅटेगरी | IPO सब्स्क्रिपशन | शेअर्स |
---|---|---|
QIB | 3.86x | 1,556,690 |
NII | 5.38x | 1,167,514 |
RII | 10.23x | 2,724,198 |
कर्मचारी | 1.81x | 70,000 |
एकूण | 7.30x | 5,518,402 |
अलॉटमेंट चेक करा : येथे क्लिक करा