आय.आर.एफ.सी ची स्थापना 1986 मध्ये झाली. भारतीय रेल्वेला भाडेतत्त्वावर देण्यात येणार्या मालमत्तांच्या निर्मितीसाठी आणि संपादनासाठी वित्तपुरवठा करणे हे त्यामागचे उद्द्येश होते. आय.आर.एफ.सी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून निधी उभारू शकतो, परंतु तो थेट भारतीय रेल्वेकडे देऊ शकत नाही. त्यासाठी मालमत्ता संपादन करून ती रेल्वेला भाडेतत्त्वावर घ्यावी लागतात.
हे एक जोखीममुक्त व्यवसाय मॉडेल आहे कारण मिनिस्टरी ऑफ रेल्वे (MOR) कडून प्राप्त झालेल्या सर्व भाडेपट्टय़ांचा केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश आहे. भारतीय रेल्वेची कर्ज घेणारी शाखा असल्याने, रोलिंग स्टॉक मालमत्ता खरेदी करण्यासाठी आवश्यक असणार्या MOR साठी निधी उभारण्याची जबाबदारी IRFC ची आहे.
30 वर्षांच्या लीज कालावधीसाठी रोलिंग स्टॉक मालमत्ता खरेदीकरिता वित्तपुरवठा करण्यासाठी हे आर्थिक लीज मॉडेलचे अनुसरण करते. 2019 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेचा प्रत्यक्ष भांडवली खर्च रु. 1334. अब्ज होता. त्यापैकी 39.34% म्हणजेच रु. 525.35 अब्ज अर्थसाहाय्य हे IRFC ने केले होते.
प्लस पॉईंट्स :
- भारतीय रेल्वे वाढीमध्ये सामरिक भूमिका
- क्रेडिट रेटिंग उदा. क्रिसिल AAA/ A1 + आणि ICRA AAA/ A1 +
- कर्ज घेण्याची स्पर्धात्मक किंमत.
- मजबूत आर्थिक कामगिरी
- अनुभवी व्यवस्थापन संघ
कंपनी प्रमोटर :
रेल्वे मंत्रालयाद्वारे काम पाहणारे भारताचे राष्ट्रपती हे कंपनीचे प्रमोटर आहेत.
गेल्या पाच वर्षातील कंपनीची आर्थिक कामगिरी:
IPOचे उद्देश:
- व्यवसायातील भविष्यातील विकासाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या इक्विटी कॅपिटल बेसमध्ये वाढ करणे.
- सामान्य कॉर्पोरेट हेतू पूर्ण करण्यासाठी.
IPOचा तपशील:
इश्यूचा टाईप | बुक बिल्ट इश्यू IPO |
दर्शनी मूल्य | ₹ 10 प्रति इक्विटी शेअर |
IPO किंमत | ₹ 25 – ₹26 प्रति इक्विटी शेअर |
मार्केट लॉट | 575 शेअर्स |
किमान ऑर्डर | 575 शेअर्स |
सूचीबद्ध एक्स्चेंज | BSE आणि NSE |
IPO साईझ | ₹10 चे 1,782,069,000 शेअर्स (₹ 4,633.38 कोटी) |
फ्रेश इश्यू | ₹10 चे 1,188,046,000 शेअर्स |
ऑफर फॉर सेल | ₹10 चे 594,023,000 शेअर्स |
IPO उघडण्याची तारीख | 18 जानेवारी 2021 |
IPO बंद होण्याची तारीख | 20 जानेवारी 2021 |
बेसिस ऑफ अलॉटमेंटची तारीख | 25 जानेवारी 2021 |
रिफंडची तारीख | 27 जानेवारी 2021 |
डीमॅट खात्यावर क्रेडिट | 28 जानेवारी 2021 |
लिस्टींगची तारीख | 29 जानेवारी 2021 |
IPO लॉट साइज:
अर्ज | लॉट | शेअर्स | रक्कम (कट ऑफ) |
---|---|---|---|
किमान | 01 | 575 | ₹14,950 |
जास्तीत जास्त | 13 | 7475 | ₹1,94,350 |
IPO सब्स्क्रिपशन:
कॅटेगरी | IPO सब्स्क्रिपशन | शेअर्स |
---|---|---|
QIB | 3.78x | 356,375,339 |
NII | 2.67x | 267,281,504 |
RII | 3.66x | 623,656,843 |
कर्मचारी | 43.76x | 192,307 |
एकूण | 3.49x | 1,247,505,993 |
अलॉटमेंट चेक करा : येथे क्लिक करा