होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेडची स्थापना २०१० मध्ये झाली. हि एक सर्वसामन्यांना परवडणारी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे. कंपनी मध्यम व निम्न उत्पन्न गटातील पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करते.
पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यावसायिकांना घरे बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी कंपनी गृहनिर्माण कर्ज देते. कंपनी मालमत्ता विरुद्ध कर्ज आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदीसाठी कर्ज देते.
महाराष्ट्रात, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि भारतातील इतर राज्यांमध्ये 60 जिल्ह्यांमध्ये सुमारे 70 शाखा कार्यरत आहेत. कंपनीने उत्कृष्ट विकास कायम राखला आहे.
प्लस पॉईंट्स :
- तंत्रज्ञान-संचालित गृहनिर्माण कंपनी
- सर्वात मोठ्या गृहनिर्माण वित्त बाजारात मजबूत प्रवेश
- विविध लीड सोर्स चॅनेल
- अनुभवी आणि पात्र व्यवस्थापन
कंपनी प्रमोटर :
ट्रू नॉर्थ फंड V LLP आणि एथर (मॉरिशस) लिमिटेड हे या कंपनीचे प्रमोटर आहेत.
गेल्या पाच वर्षातील कंपनीची आर्थिक कामगिरी:
IPOचे उद्देश:
- भविष्यातील भांडवलाची गरज भागविण्यासाठी कंपनीचा भांडवल बेस वाढविणे
- एक्सचेंजमध्ये शेअर लिस्टिंगचे फायदे साध्य करणे
IPOचा तपशील:
इश्यूचा टाईप | बुक बिल्ट इश्यू IPO |
दर्शनी मूल्य | ₹ 2 प्रति इक्विटी शेअर |
IPO किंमत | ₹517- ₹518 प्रति इक्विटी शेअर |
मार्केट लॉट | 28 शेअर्स |
किमान ऑर्डर | 28 शेअर्स |
सूचीबद्ध एक्स्चेंज | BSE आणि NSE |
IPO साईझ | ₹2 चे xxxx शेअर्स (₹ 1,153.72 कोटी) |
फ्रेश इश्यू | ₹2 चे xxxx शेअर्स (₹ 265.00 कोटी) |
ऑफर फॉर सेल | ₹2 चे xxxx शेअर्स (₹ 888.72 कोटी) |
IPO उघडण्याची तारीख | 21 जानेवारी 2021 |
IPO बंद होण्याची तारीख | 25 जानेवारी 2021 |
बेसिस ऑफ अलॉटमेंटची तारीख | 29 जानेवारी 2021 |
रिफंडची तारीख | 01 फेब्रुवारी 2021 |
डीमॅट खात्यावर क्रेडिट | 02 फेब्रुवारी 2021 |
लिस्टींगची तारीख | 03 फेब्रुवारी 2021 |
IPO लॉट साइज:
अर्ज | लॉट | शेअर्स | रक्कम (कट ऑफ) |
---|---|---|---|
किमान | 01 | 28 | ₹14,504 |
जास्तीत जास्त | 13 | 364 | ₹1,88,552 |
IPO सब्स्क्रिपशन:
कॅटेगरी | IPO सब्स्क्रिपशन | शेअर्स |
---|---|---|
QIB | 1.28x | 4,463,127 |
NII | 0.13x | 3,347,346 |
RII | 1.29 | 7,810,475 |
कर्मचारी | 0x | माहिती उपलब्ध नाही |
एकूण | 1.04x | 15,620,948 |
अलॉटमेंट चेक करा : येथे क्लिक करा