how-telegram-app-make-money-marathi-udyojak-info.jpg
how-telegram-app-make-money-marathi-udyojak-info.jpg

५००+ मिलिअन्स युजर्सचे टेलिग्रॅम ॲप पैसे कसे कमावते ?

निकोलाय आणि पावेल दुरोव या दोन रशियन भावांनी २०१३ मध्ये टेलिग्राम ॲप लाँच केले. आणि आता त्याचे महिन्याचे ॲक्टिव्ह युजर्स ५०० मिलिअन्सपेक्षा जास्त आहेत.

तरीही, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की कंपनीने आजपर्यत एकही पैसे कमावलेले नाहीत. कंपनी सध्या फक्त मिळणाऱ्या देणग्यांवर विसंबून आहे.

कंपनीचे सहसंस्थापक पावेल दुरोव यांनी सांगितले की, त्यांनी कंपनीचा मोठा खर्च त्यांच्या वैयक्तिक बचतीतून केला आहे.

डिसेंबर २०२० मध्ये, पावेल दुरोव यांनी त्यांच्या सार्वजनिक टेलिग्राम चॅनेलवरून त्यांच्या कमाई करण्याच्या योजना सांगणारा मेसेज शेअर केला.

त्यांनी म्हटले की, आम्ही Whatsapp च्या संस्थापकांप्रमाणे कंपनी विकणार नाही. टेलिग्राम दीर्घकाळापर्यंत राहील.

आम्‍ही कमाई करण्‍यास सुरूवात करू परंतु सध्‍याची सर्व मोफत वैशिष्‍ट्ये ही कायम मोफत राहतील आणि बहुतेक युजर्सना कोणताही बदल जाणवणार नाही.

खाजगी किंवा ग्रुप चॅटमध्ये कोणत्याही जाहिराती नसतील. आम्ही विविध चॅनेल्सकरिता आमचे जाहिरात प्लॅटफॉर्म सादर करू.

या मोठ्या चॅनेलच्या मालकांना आमच्या जाहिरातींचे फायदे देखील मिळतील. परंतु आम्ही युजर्सच्या प्रायव्हसी किंवा डेटाशी कधीही तडजोड करणार नाही. हेच टेलिग्राम असेल.