national-securities-depository-ltd-nsdl-ipo-udyojak-info

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) IPO

कंपनीबद्दल:

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ही SEBI-नोंदणीकृत Market Infrastructure Institution (MII) असून, ती भारतातील वित्तीय व सिक्युरिटी मार्केटसाठी विविध सेवा आणि उत्पादने पुरवते. 1996 साली Depositories Act लागू झाल्यानंतर, NSDL ने देशात पहिल्यांदाच सिक्युरिटीजचं डिमॅट स्वरूप सुरू केलं. 31 मार्च 2025 पर्यंत, NSDL ही भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी ठरली आहे. (जास्तीत जास्त issuers, active instruments, आणि assets under custody या सर्व निकषांवर)

NSDL चं देशभरात 65,391 सर्व्हिस सेंटर्सचं नेटवर्क आहे, जे CDSL च्या तुलनेत चार पट अधिक आहे. कंपनी एक सशक्त आणि सुरक्षित डिपॉझिटरी फ्रेमवर्क प्रदान करते, ज्यामुळे गुंतवणूकदार, ब्रोकर्स, आणि इतर बाजारातील सहभागी सुरक्षितपणे व्यवहार करू शकतात. आधुनिक आणि लवचिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, NSDL देशातील सिक्युरिटी मार्केटचं डिजिटायझेशन, सेटलमेंट सुविधा, आणि खर्चकपातीच्या उपाययोजना सुलभ करते.

NSDL मार्फत गुंतवणूकदार Demat Account च्या माध्यमातून इक्विटी, डिबेंचर, म्युच्युअल फंड, सरकारी रोखे, गोल्ड बॉन्ड्स इत्यादी विविध asset classes डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात. कंपनी डिपॉझिटरी सेवेव्यतिरिक्त ई-सेवा, व्हॅल्यू-ऍडेड सेवा आणि NDML व NPBL या उपकंपन्यांच्या माध्यमातून डिजिटल समाधान पुरवते. वार्षिक फी, व्यवहार शुल्क आणि तांत्रिक नवकल्पनांमुळे NSDL ही भारतातील वित्तीय बाजारातील एक महत्त्वाची संस्था ठरते.

व्यवसायाचे स्वरूप:

  • ई-वोटिंग, Consolidated Account Statement (CAS), आणि Non-Disposal Undertaking (NDU) यांसारख्या पूरक सेवा पुरवते.
  • भारतात सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून कार्य करते.
  • सिक्युरिटीजच्या वाटप व मालकी हस्तांतराची इलेक्ट्रॉनिक नोंद ठेवते.
  • डिमॅट, ट्रेड सेटलमेंट, ऑफ-मार्केट ट्रान्सफर, सिक्युरिटीजवर गहाण ठेवणे (pledge), कॉर्पोरेट अ‍ॅक्शन यांसारख्या डिपॉझिटरी सेवा पुरवते.
  • डिमॅट स्वरूपात ठेवलेल्या सिक्युरिटीजसाठी Asset Servicing सेवा देते.

कंपनी प्रमोटर :

  • IDBI बँक – 26.10%
  • NSE (National Stock Exchange) – 24.00%
  • HDFC बँक – 8.90%
  • SUUTI (Specified Undertaking of Unit Trust of India) – 6.83%

IPOचा उद्देश:

  • इक्विटी शेअर्सची लिस्टिंग BSE वर करून त्याचे फायदे घेणे.
    टीप: या IPO मध्ये फक्त Offer for Sale (OFS) आहे, त्यामुळे कंपनीकडे थेट निधी येणार नाही. IPO चा उद्देश केवळ शेअर्सची लिस्टिंग करून पारदर्शकता, ब्रँड व्हॅल्यू व सेकंडरी मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढवणे हाच आहे.
डाउनलोड DRHP

कंपनीची आर्थिक कामगिरी:

कालावधी समाप्ती31 मार्च 202531 मार्च 202431 मार्च 2023
मालमत्ता (Assets)2,984.842,257.742,093.48
उत्पन्न (Revenue)1,535.191,365.711,099.81
Profit After Tax343.12275.45234.81
EBITDA492.94381.13328.60
Net Worth2,005.341,684.101,428.86
Reserves आणि Surplus232.31216.32199.08
एकूण कर्ज
रक्कम ₹ कोटींमध्ये

IPOचा तपशील:

तपशीलमाहिती
दर्शनी मूल्य (Face Value)₹2 प्रति शेअर
इश्यू किंमत बँड (Price Band)₹800 प्रति शेअर
लॉट साइज (Lot Size)18 शेअर्स
विक्री प्रकार (Sale Type)Offer For Sale (OFS)
एकूण इश्यू साइज5,01,45,001 शेअर्स
कर्मचाऱ्यांसाठी सवलत (Employee Discount)₹76 प्रति शेअर
इश्यू प्रकार (Issue Type)बुक बिल्ट IPO
सूचीबद्ध होणार (Listing At)BSE
इश्यूपूर्व शेअरहोल्डिंग20,00,00,000 शेअर्स
इश्यूनंतर शेअरहोल्डिंग20,00,00,000 शेअर्स

IPO रिझर्वेशन:

गुंतवणूकदार वर्गशेअर्सची संख्या (टक्केवारी)कमाल अलॉटमेंट संख्या (Maximum Allottees)
QIB शेअर्स ऑफर2,50,29,999 (49.92%)लागू नाही (NA)
– Anchor Investor शेअर्स1,50,17,999 (29.95%)लागू नाही (NA)
– QIB (Anchor वगळता) शेअर्स1,00,12,000 (19.97%)लागू नाही (NA)
NII (HNI) शेअर्स ऑफर75,09,001 (14.97%)लागू नाही (NA)
– bNII (> ₹10 लाख)50,06,001 (9.98%)19,865
– sNII (< ₹10 लाख)25,03,000 (4.99%)9,932
Retail शेअर्स ऑफर1,75,21,001 (34.94%)9,73,388
Employee शेअर्स ऑफर85,000 (0.17%)लागू नाही (NA)
एकूण शेअर्स ऑफर5,01,45,001 (100.00%)

गुंतवणूकदार वर्गासाठी राखीव नियम:

अर्जदार वर्गकमाल बोली मर्यादा (Bidding Limits)कट-ऑफ किंमतीवर बोली देणे परवानगी आहे का?
फक्त RII (Retail Individual Investors)₹2 लाखांपर्यंतहोय
फक्त sNII (Small Non-Institutional Investors)₹2 लाख ते ₹10 लाखनाही
फक्त bNII (Big Non-Institutional Investors)₹10 लाख ते NII राखीव भागनाही
फक्त कर्मचारी (Employee)₹2 लाखांपर्यंतहोय
कर्मचारी + RII/NII (संयुक्त अर्ज)– कर्मचारी मर्यादा: ₹2 लाखांपर्यंत (काही प्रकरणांत, कर्मचारी ₹2 लाखांपर्यंत बोली दिल्यास सवलत मिळू शकते).
– जर RII म्हणून अर्ज केला तर: ₹2 लाखांपर्यंत बोली देता येते.
– जर NII म्हणून अर्ज केला तर:
 • sNII = ₹2 लाखांपेक्षा जास्त आणि ₹10 लाखांपर्यंत,
 • bNII = ₹10 लाखांपेक्षा जास्त.
होय

IPOचे वेळापत्रक:

तपशीलतारीख
IPO उघडण्याची तारीखबुधवार, 30 जुलै 2025
IPO बंद होण्याची तारीखशुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
बेसिस ऑफ अलॉटमेंटची तारीखसोमवार, 4 ऑगस्ट 2025
रिफंडची तारीखमंगळवार, 5 ऑगस्ट 2025
डीमॅट खात्यावर क्रेडिटमंगळवार, 5 ऑगस्ट 2025
लिस्टींगची अंदाजे तारीखबुधवार, 6 ऑगस्ट 2025

IPO लॉट साइज:

अर्ज प्रकारलॉट्सशेअर्सरक्कम (₹)
Retail (किमान)118₹14,400
Retail (कमाल)13234₹1,87,200
S-HNI (किमान)14252₹2,01,600
S-HNI (कमाल)691,242₹9,93,600
B-HNI (किमान)701,260₹10,08,000

IPO सब्स्क्रिपशन:

गुंतवणूकदार वर्गसदस्यता (पट)शेअर्स ऑफर (Shares Offered)बोली दिलेले शेअर्स (Shares Bid For)एकूण रक्कम (₹ कोटींमध्ये)आकारमान (%) (Size %)
Anchor Investors1x1,50,17,9991,50,17,9991,201.4423.05%
QIB103.97x2,50,29,9991,04,09,16,6548,327.3338.41%
एकूण NII34.98x75,09,00126,26,54,6142,101.2411.52%
– bNII
(> ₹10 लाख)
37.73x50,06,00118,88,92,5401,511.147.68%
– sNII
(< ₹10 लाख)
29.47x25,03,0007,37,62,074590.093.84%
RII7.76x1,75,21,00113,59,55,5301,401.6826.89%
Employees15.39x85,00013,07,9706.800.13%
एकूण41.02x6,51,63,0001,44,08,34,76813,038.44100%

अलॉटमेंट चेक करा : येथे क्लिक करा 

लिस्टिंग तारीख : 6 ऑगस्ट 2025
लिस्टिंग किंमत : ₹___ प्रति शेअर (__%)